Sunday, 26 October 2014

प्रश्नसंच ३ - [अर्थशास्त्र]

प्रश्नमंजुषा - 3

प्र.१  संपूर्ण भारतीयांच्या मालकीची पहिली बँक कोणती?

A. हिंदुस्थान बँक
B. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
C. पंजाब नॅशनल बँक
D. स्टेट बँक ऑफ इंडिया

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. पंजाब नॅशनल बँक
प्र.२  खालीलपैकी कोणती बँक प्रेसिडेन्सी बँक म्हणून ओळखली जात नव्हती?

A. बँक ऑफ बॉम्बे
B. बँक ऑफ कलकत्ता
C. बँक ऑफ हैद्राबाद
D. बँक ऑफ मद्रास 

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. बँक ऑफ हैद्राबाद
प्र.३  उत्पादन क्षमतेच्या कमतरतेमुळे निर्माण होणारी बेरोजगारी कोणती?

A. संरचनात्मक
B. सुशिक्षित
C. चक्रीय
D. घर्षणात्मक

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

A. संरचनात्मक
प्र.४   जीवनाची भौतिक गुणवत्ता निर्देशांक तयार करताना खालीलपैकी कोणत्या घटकाचा विचार केला जात नाही?

A. आयुर्मान
B. साक्षरता
C. जन्मदर
D. मृत्युदर

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. जन्मदर
प्र.५  स्थानिक क्षेत्रीय बँक संबंधी अयोग्य पर्याय निवडा.

A.या बँकांचे कार्यक्षेत्र तीन सलग जिल्ह्यांचा विभाग आहे.
B. स्थानिक क्षेत्रीय बँकांच्या स्थापनेचे धोरण २००२ सालच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले.
C. या बँकांचे भाग भांडवल किमान ५ कोटी रुपये असावे.
D. या बँकांना जिल्ह्याच्या कार्यक्षेत्राबाहेर शाखा काढण्यास बंदी आहे.

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

B. स्थानिक क्षेत्रीय बँकांच्या स्थापनेचे धोरण २००२ सालच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले.
प्र.६  नरसिंहन समिती-२ च्या शिफारसीने खालीलपैकी कोणती घटना घडली?

A. भारताने उदारीकरण धोरण स्वीकारले.
B. RBI ने SBI मधील भागीदारी भारत सरकारला विकली.
C. संपूर्ण भारतात समान मूल्यवर्धित कर लागू करण्यात आला.
D. वरीलपैकी सर्व

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

B. RBI ने SBI मधील भागीदारी भारत सरकारला विकली.
प्र.७   १९९४च्या भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकाच्या अंशिक खाजगीकरणाने खालीलपैकी कोणत्या बाबी घडल्या?
अ] बँकांनी खुल्या बाजारात शेअर्स विकून भांडवल उभारणीची संमती मिळाली.
ब] भारतीय बँकांमध्ये परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीस अटीनुसार संमती मिळाली.

पर्याय
A. फक्त अ
B. फक्त ब
C. अ आणि ब दोन्ही
D. वरीलपैकी एकही नाही

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. अ आणि ब दोन्ही
प्र.८  खालील दरडोई उत्पन्न [गट १] आणि त्या सर्वेक्षणाशी संबंधित व्यक्ती[गट २] यांच्या योग्य जोड्या लावा.

[गट १]                              [गट २]
अ] ६२ रु.                          I] एफ शिरास
ब] २० रु.                           II] दादाभाई नौरोजी
क] ४९ रु.                          III] व्ही.के.आर.व्ही.राव

पर्याय
A. अ-I, ब-II, क-III
B. अ-III, ब-II, क-I
C. अ-III, ब-I, क-II
D. अ-II, ब-I, क-III

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

B. अ-III, ब-II, क-I
प्र.९   मानव विकास निर्देशांकात खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होत नाही?

अ] मृत्यू समयीचे वर
ब] प्रौढ साक्षरता दर
क] पोषण मुल्य उपलब्धता

A. फक्त अ आणि ब
B. फक्त अ आणि क
C. फक्त ब आणि क
D. वरील सर्व

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

B. फक्त अ आणि क
प्र.१०   केंद्रीय सांख्यिकी संस्थेसंबंधी [CSO] अयोग्य विधान ओळखा.

अ] या संस्थेच्या स्थापनेची घोषणा १९५४ मध्ये झाली.
ब] भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची जबाबदारी या संस्थेवर आहे.
क] या संस्थेचे मुख्यालय मुंबई येथे आहे.
ड] संस्थेचा कारभार १९५५ साली सुरु झाला.

पर्याय:
A. अ आणि ड
B.फक्त क
C. फक्त ड
D. क आणि ड

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

B.फक्त क

प्रश्नसंच २ - [इतिहास]

प्रश्नमंजुषा - 2
प्र.१  महिला राष्ट्रीय संघ कोणी स्थापन केला?

A. लतिका घोष
B. सरोजिनी नायडू
C. कृष्णाबाई राव
D. उर्मिला देवी

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

A. लतिका घोष
प्र.२  पहिल्या कर्नाटक युद्धानंतर कोणत्या तहानुसार फ्रेंचांनी इंग्रजांना मद्रास दिले?

A. अक्स-ला-चॅपेलचा तह
B. पॉंडेचेरीचा तह
C. मँगलोरचा तह
D. पॅरिसचा तह

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

A. अक्स-ला-चॅपेलचा तह
प्र.३  १८५७च्या उठावाचा बिहारमधील प्रमुख नेता कोण होता?

A. खान बहादूर खान
B. कुंवरसिंग
C. मौलवी अहमदुल्ला
D. रावसाहेब

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

B. कुंवरसिंग
प्र.४   डलहौसीने झाशी संस्थान केव्हा खालसा केले?

A. १८४९
B. १८५१
C. १८५३
D. १८५४

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. १८५३
प्र.५  १९०९ मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी कोणते वृत्तपत्र प्रकाशित केले?

A. फ्री इंडिया
B. नया भारत
C. फ्री प्रेस जर्नल
D. लीडर

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

D. लीडर
प्र.६  १८५७च्या उठावाबाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने ओळखा.

अ] उठावकर्त्यांना विशिष्ठ राजकीय उद्दिष्ट नव्हते.
ब] झीनत महल हिने स्वतःच्या सुरक्षेसाठी इंग्रजांशी बोलणी केली.

A. फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही
D. वरीलपैकी एकही नाही

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. वरील दोन्ही
प्र.७   खाली दिलेल्या भारताच्या व्हॉइसरॉय यांचा योग्य कालक्रम लावा.

अ] लॉर्ड कर्झन
ब] लॉर्ड चेम्सफर्ड
क] लॉर्ड हार्डिंग्स II
ड] लॉर्ड आयर्विन

पर्याय
A. अ-ब-क-ड
B. अ-क-ब-ड
C. क-अ-ब-ड
D. अ-ड-क-ब

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

B. अ-क-ब-ड
प्र.८   विधान :- अ] १९२९ चा बालविवाह कायदा हा शारदा कायदा म्हणून प्रसिद्ध आहे.
स्पष्टीकरण:-  ब] उमा शंकर सारडा यांनी हा कायदा केंद्रीय कायदेमंडळात मांडला.

पर्याय
A. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
B. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
C. अ बरोबर आणि ब चूक
D. अ चूक आणि ब बरोबर

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

A. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
प्र.९   कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये भारतीयांना स्थान मिळाले?

A. भारत सरकारचा कायदा १९३५
B. भारत सरकारचा कायदा १९१९
C. भारत कौन्सिल कायदा १९०९
D. भारत कौन्सिल कायदा १८९२

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. भारत कौन्सिल कायदा १९०९
प्र.१०   विधान:- अ] १९३९च्या त्रिपुरा अधिवेशनाच्या अध्यक्षीय निवडणुकीत सुभाषचंद्र बोस यांनी सितारामय्या यांचा पराभव केला.
स्पष्टीकरण:- ब] सितारामय्या यांना निवडणुकीत महात्मा गांधींचा पाठींबा होता.

पर्याय
A. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे,
B.फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
C. अ बरोबर आणि ब चूक
D. अ चूक आणि ब बरोबर

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

B. कोलकाता

प्रश्नसंच १ - [भूगोल]

प्रश्नमंजुषा - 1
प्र.१  महाराष्ट्रात सुपारीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते?

A. रायगड
B. रत्नागिरी
C. सिंधुदुर्ग
D. ठाणे

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

A.रायगड
प्र.२  सलाल जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?

A. झेलम
B. रावी
C. चिनाब
D. बियास

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. चिनाब
प्र.३  भारतातील पहिला रेयॉन प्रकल्प १९५० साली कोणत्या राज्यात उभारला गेला?

A. उत्तर प्रदेश
B. केरळ
C. तामिळनाडू
D. महाराष्ट्र

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

B. केरळ
प्र.४  देशातील सर्वात मोठे सुती वस्त्रोत्पादक राज्य कोणते?

A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. पश्चिम बंगाल
D. केरळ

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

A. महाराष्ट्र
प्र.५  कोणत्या नदीला ट्रान्स हिमालयीन नदी असेही संबोधले जाते?

A. गंगा
B. सतलज
C. सियाचिन ग्लेशियर
D. सिंधू

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

B. सतलज
प्र.६  खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने ओळखा.

अ] एकाच प्रकारचे खडक व त्यांची समान रचना असलेल्या भागात वृक्षाकार जलप्रणाली आढळते.
ब] जेथे मुख्य नदीला उपनद्या काटकोनात मिळतात तेथे आयताकार जलप्रणाली आढळते.

A. फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही
D. वरीलपैकी एकही नाही

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. वरील दोन्ही
प्र.७  खालील वने [गट १] आणि त्या संबंधित पर्जन्य प्रमाण [गट २] यांच्या योग्य जोड्या लावा.

[गट १]
अ] मान्सून वने.
ब] उष्ण कटिबंधीय सदाहरित वने.
क] उष्ण कटिबंधीय आद्र पानझडी वने.
[गट २] (सेमी)
I] २०१-२५०
II] २५१-३००
III] १०१-२००

पर्याय
A. अ-I, ब-II, क-III
B. अ-III, ब-II, क-I
C. अ-III, ब-I, क-II
D. अ-II, ब-I, क-III

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

A. अ-I, ब-II, क-III
प्र.८  खालील विधाने लक्षात घ्या व अयोग्य विधाने ओळखा.

अ] मारवाड पठार खनिज समृद्ध आहे.
ब] द्वीपकल्पीय भारतात भूकंप होत नाहीत.

A. फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही
D. वरीलपैकी एकही नाही 

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

D. वरीलपैकी एकही नाही
प्र.९  खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने ओळखा.

अ] बंगळूरला मंगलोरपेक्षा अधिक पाऊस पडतो.
ब] बंगळूरला नैऋत्य मौसमी वारे व परतीच्या पावसाचा फायदा मिळतो.

A.फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही
D. वरीलपैकी एकही नाही

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

B. फक्त ब
प्र.१०  विधान अ] उत्तर व वायव्य भारतात डिसेंबर-जानेवारी महिन्यात कधी कधी पाऊस पडतो.
स्पष्टीकरण ब] नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास हिवाळ्यात चालू होतो.

पर्याय:
A. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे,
B. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
C. अ बरोबर आणि ब चूक
D. अ चूक आणि ब बरोबर

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

B. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.

प्रश्नसंच १२४ - [भूगोल]

प्रश्नमंजुषा -124
प्र.१ भारतात सर्वाधिक क्षेत्रफळावर घेतले जाणारे पिक कोणते?

A. ज्वारी
B. गहू
C. तांदूळ
D.कापूस

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. तांदूळ
प्र.२ महाराष्ट्रात सर्वाधिक जैवविविधता कोठे आढळते?

A. पश्चिम घाट
B.सातपुडा पर्वतरांग
C. मेळघाट प्रदेश
D.गडचिरोली टेकड्या

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

A. पश्चिम घाट
प्र.३ भारतात सर्वाधिक क्षेत्रफळावर घेतले जाणारे फळ पिक कोणते?

A. आंबा
B. केळी
C. संत्रे
D. कलिंगड

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. आंबा
प्र.४ क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते?

A. उत्तर प्रदेश
B. बिहार
C. महाराष्ट्र
D. मध्यप्रदेश

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. महाराष्ट्र
प्र.५ कवी कुलगुरू विद्यापीठ कोठे आहे?

A. हरिद्वार
B. अलाहाबाद
C. रामटेक
D. रामेश्वर

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. रामटेक
प्र.६ डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे?

A. नाशिक
B. महु
C. नागपूर
D. मुंबई

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. नागपूर
प्र.७ ‘मुरीया’, ‘बैगा’ या जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळतात?

A. छत्तीसगढ
B. हरियाणा
C. आसाम
D. पंजाब

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

A. छत्तीसगढ
प्र.८ केबल नसलेली घरे आणि जिथे केबल सेवा पोहोचलेली नाही अशामधली दरी भरून काढण्यासाठी DTH सेवा कोणी सुरु केली?

A. व्हिडीओकॉन
B. एअरटेल
C. प्रसारभारती
D. टाटा स्काय

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. प्रसारभारती
प्र.९ ‘टर्मिनेटर’ या तंत्रज्ञानाचा उपयोग खालीलपैकी कोणत्या पिकासाठी केला जातो?

A. ज्वारी
B. गहू
C. तांदूळ
D. कापूस

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

D. कापूस
प्र.१० भारत-पाकिस्तान वादाचा मुद्दा ठरलेला बगलिहार प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?

A. झेलम
B. चिनाब
C. सिंधू
D. सतलज

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

B. चिनाब

Saturday, 25 October 2014

राज्यसेवा पूर्वपरीक्षा-महत्वाची पुस्तके

  1. आधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव पवार
  2. आधुनिक भारत- बिपीन चंद्र
  3. समाजसुधारक- के सागर
  4. महाराष्ट्राचा भूगोल- ए. बी. सवदी
  5. पंचायतराज- के सागर
  6. भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे
  7. विज्ञान आणि तंत्रज्ञान- रंजन कोळंबे
  8. गणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणे
  9. बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
  10. चालू घडामोडी- लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, चाणक्य मंडल मासिक, योजना, लोकराज्य,इंटरनेट
  11. गाईड- एकनाथ पाटील / के सागर
  12. तसेच इयत्ता ८वी ते १२वी ची राज्य शासनाची पुस्तके वाचा

राज्यसेवा इतिहास अभ्यासक्रम

  1. भारतात युरोपियन वसाहतीची सुरुवात (१६०० ते १८५७)
  2. ब्रिटिश सत्तेची स्थापना व विस्तार (१७५७ - १८१८)
  3. ब्रिटिश सत्तेचे एकत्रीकरण (१८१८-१८५७)
  4. इंग्रज सरकारचे प्रशासन
  5. १८५७ चा राष्ट्रीय उठाव 
  6. भारतीय सुधारणा चळवळीला प्रारंभ
  7. राष्ट्रसभेची (कॉग्रेसची)स्थापना
  8. राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या संस्था
  9. राष्ट्रीय चळवळीचा प्रारंभीचा कालखंड
  10. राष्ट्रीयत्वाच्या जाणिवेचा उदय व विकास 
  11. सामाजिक सुधारविषयक कायदे
  12. जहालवादाचा विकास आणि (लोकमान्य टिळकांची) भूमिका 
  13. भारतीय क्रांतीकारी चळवळ 
  14. गांधीजींचे पदार्पण 
  15. गांधीवादाचा विकास आणि महात्मा गांधीजींची भूमिका 
  16. दुसर्‍या महायुध्दाच्या काळातील स्वातंत्र्य चळवळ 
  17. हिंदी राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे
  18. मवाळवादी युग आणि गोपाळ कृष्ण गोखले यांची भूमिका
  19. सत्याग्रह पर्वाला प्रारंभ
  20. सविनय कायदेभंग आंदोलन
  21. असहकार आंदोलन
  22. चलेजाव आंदोलन (१९४२)
  23. स्वदेशीची चळवळ
  24. क्रांतिकारी चळवळी आणि भारतीय राष्ट्रीय आर्मी
  25. भारत स्वतंत्र झाला
  26. द्विराष्ट्र सिध्दान्त आणि हिंदुस्थानची फाळणी
  27. भारतातील फ्रेंच आणि पोर्तुगीज वसाहतींची मुक्तता
  28. संस्थानिक राज्यांचे विलीनीकरण
  29. स्वतंत्र भारताची राज्यघटना
  30. पंचशील आणि अलिप्तवाद 

स्पर्धा परीक्षा परीक्षार्थींसाठी

मित्रांनो हा Blog MPSC, UPSC आणि इतर स्पर्धा परीक्षाच्या मार्गदर्शनाकरीता आम्ही सुरु केला आहे. MPSCचे बदलते स्वरुप आणि नवीन अभ्यासक्रम या सर्वांचा विचार करून आम्ही तुम्हाला उपयुक्त अशी माहिती देणार आहोत. या Blog वर तुमच्यासाठी चालू घडामोडी, बदलत्या स्वरूपानुसार प्रश्नोत्तरे तसेच स्पर्धा परीक्षांसंदर्भात इतर माहिती पुरविणार आहोत.

आमच्या Blog मुळे जास्तीत जास्त विद्यार्थी पुढे गेल्यास आम्हाला आनंद होईल.

तुम्ही सर्व या उपक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा करतो.

धन्यवाद.