Sunday, 26 October 2014

प्रश्नसंच १ - [भूगोल]

प्रश्नमंजुषा - 1
प्र.१  महाराष्ट्रात सुपारीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते?

A. रायगड
B. रत्नागिरी
C. सिंधुदुर्ग
D. ठाणे

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

A.रायगड
प्र.२  सलाल जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?

A. झेलम
B. रावी
C. चिनाब
D. बियास

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. चिनाब
प्र.३  भारतातील पहिला रेयॉन प्रकल्प १९५० साली कोणत्या राज्यात उभारला गेला?

A. उत्तर प्रदेश
B. केरळ
C. तामिळनाडू
D. महाराष्ट्र

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

B. केरळ
प्र.४  देशातील सर्वात मोठे सुती वस्त्रोत्पादक राज्य कोणते?

A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. पश्चिम बंगाल
D. केरळ

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

A. महाराष्ट्र
प्र.५  कोणत्या नदीला ट्रान्स हिमालयीन नदी असेही संबोधले जाते?

A. गंगा
B. सतलज
C. सियाचिन ग्लेशियर
D. सिंधू

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

B. सतलज
प्र.६  खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने ओळखा.

अ] एकाच प्रकारचे खडक व त्यांची समान रचना असलेल्या भागात वृक्षाकार जलप्रणाली आढळते.
ब] जेथे मुख्य नदीला उपनद्या काटकोनात मिळतात तेथे आयताकार जलप्रणाली आढळते.

A. फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही
D. वरीलपैकी एकही नाही

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. वरील दोन्ही
प्र.७  खालील वने [गट १] आणि त्या संबंधित पर्जन्य प्रमाण [गट २] यांच्या योग्य जोड्या लावा.

[गट १]
अ] मान्सून वने.
ब] उष्ण कटिबंधीय सदाहरित वने.
क] उष्ण कटिबंधीय आद्र पानझडी वने.
[गट २] (सेमी)
I] २०१-२५०
II] २५१-३००
III] १०१-२००

पर्याय
A. अ-I, ब-II, क-III
B. अ-III, ब-II, क-I
C. अ-III, ब-I, क-II
D. अ-II, ब-I, क-III

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

A. अ-I, ब-II, क-III
प्र.८  खालील विधाने लक्षात घ्या व अयोग्य विधाने ओळखा.

अ] मारवाड पठार खनिज समृद्ध आहे.
ब] द्वीपकल्पीय भारतात भूकंप होत नाहीत.

A. फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही
D. वरीलपैकी एकही नाही 

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

D. वरीलपैकी एकही नाही
प्र.९  खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने ओळखा.

अ] बंगळूरला मंगलोरपेक्षा अधिक पाऊस पडतो.
ब] बंगळूरला नैऋत्य मौसमी वारे व परतीच्या पावसाचा फायदा मिळतो.

A.फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही
D. वरीलपैकी एकही नाही

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

B. फक्त ब
प्र.१०  विधान अ] उत्तर व वायव्य भारतात डिसेंबर-जानेवारी महिन्यात कधी कधी पाऊस पडतो.
स्पष्टीकरण ब] नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास हिवाळ्यात चालू होतो.

पर्याय:
A. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे,
B. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
C. अ बरोबर आणि ब चूक
D. अ चूक आणि ब बरोबर

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

B. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.

No comments:

Post a Comment